पुरणपोळी रेसिपी .How to make puran poli in marathi
साहित्य : अर्धा किलो हरभरा डाळ (चनाडाळ),इलायची, जायफळ, कणिक, अर्धा चमचा मीठ आणि तेल कृती : प्रथम अर्धा किलो हरभरा डाळ कुकरमध्ये पाणी घालून चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी नितळेपर्यंत ठेवावी. नंतर त्यात किसलेला गुळ घालून गॅस वर मंद आचेवर ठेवून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी. व पुरण यंत्रात घालून वाटावी.पूरणामध्ये सात ते आठ वेलचीची पूड व किंचित जायफळाची पूड घालावी. त्यानंतर कणीक चाळून त्यात अर्धा चमचा मीठ घालून कणीक सैलसर भिजवावी .पंधरा ते वीस मिनिटे भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी.लिंबाएवढा कणकेचा गोळा घेऊन वाटीसारखा आकार करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून कणिकेच्या पिठावर पोळी लाटावी व मंद आचेवर भाजावी. अशा रीतीने आपल्याला रुचकर पुरणपोळी तयार करता येते.